Skip to main content

लग्न - अग्नीपरिक्षा

तारखा पुढे पुढे सरकतात, वर्ष उलटत असतात, सगळं अगदी निर्सगाच्या नियमाने घडत असते. वयाचे काही पायंडे आपल्या पुर्वजानी घालुनच दिलेत त्याला सुध्दा आपण अपवाद नाही. मुलींच्या बाबतीत तर ते जरा जास्तच आहेत, मुलींच्या वयाचे निकष आधिच ठरवुन दिलेत म्हणजे जर तुम्ही त्या ठराविक वयाेगटात असाल तर तुमची मागणी अधिक असते.

एकविसाव्या शतकात वावरत असताना भलेही शिक्षणाच्या बाबतीत, आर्थिक बाबतीत ती पुरुषाच्या बराेबरीने किंबहुना कधीकधी त्याच्या वरचढ असतेही, सगळया माध्यमात तिला आपली मतं मांडण्याचा अधिकार आपण छातीठाेकपणे दिलाय. पण एका डिपार्टमेंट मध्ये मात्र ती स्व:ताला अजुनही अपंग, हतबल समजते ते म्हणजे "arranged marriage", जन्मापासुन असंख्य जबाबदार्‍या पार पाडत पाडत ती वयाच्या अश्या टप्पयावर येऊन थ‍ांबते की तिचा हया अतिरिक्त मागण्यांनी जीव गुदमरताे, कधी हयाची कारणे शाेधण्याचा प्रयत्न तिच्या जन्मदात्यांनी केला असेल का?

दाेष त्यांचा नसताेच, समाज नावाच्या दलदलीत त्यांना सुध्दा तग धरायचा असताे त्यामुळे वयात आलेल्या मुलीच्या डाेक्यावर कधी एकदा अक्षदा पाडुन, सुटकेचा निश्‍वास घ्यायचा असताे मग भले तिच्या स्वप्नांची मुसकटदाबी करायला लागली तरी चालेल. अशातच पायपीट हाेते तिला साजेसा असा ताेलामाेलाचा "वर" शाेधण्याची माेहीम, ती मात्र समाेरच्यांच्या नजरेत "स्थळ" बनुन राहते, एक प्रेक्षणीय स्थळ, ज्याला वराच्या साेयिनुसार बघण्याचा कार्यक्रम चालु हाेताे, न्याहीराला भलेही काही असाे पण आपण त्याला "कांदेपाेहयाचा कार्यक्रम" म्हणुनच आेळखताे. मुलीकडचे असल्यामुळे मागण्या थाेडया कमीच असतात पण समाेरचे त्याची भरपाई स्व:ताच्या अवास्तव, अवाजवी मागण्यातुन भरुन काढतात.

त्यांच्या मागण्यांची वर्गवारी पण pre-defined असते. रंग, रुप, ऊंची हयांना सर्वाेच्च स्थानि मानतात, तु जर हयात "फिट" झालिस तर मग पुढे शिक्षणात, चारित्र्यात, आचरणात खुप अॅडजेस्टमेन्ट हाेतेच. कारण तुझ्या दिसण्याला  आणि रुपाला आेघळत्या काळाच कधीच ग्रहण लागणार नाही. तु वयाच्या साठाव्या वर्षीसुध्दा तशीच टवटवीत दिसणार आहेस. स्वभाव तुझा कसाही असु. तु त्याला शाेभुनच दिसणार भले त्याची कातडी काळवंडलेली असु पण तु मात्र गाेरीपानच हवीस हा.

अजुनही एखादया याेग्यता असलेल्या मुलीला रंग, रुप, ऊंची हया परिमाणात ठेवुन माेजताे. स्व:ताची आेळख निर्माण करण्यासाठी घेतलेले कष्ट, जबाबदार्‍या सहज विसरताे त्यावेळेस. एखादया शाेभेच्या वस्तु सारखे तिला न्हायळताे, तिच्या दिसण्याविषयी मत बांधताे आणि ताे विषय टाळताे पण ती सुध्दा हया वरवरच्या दाखवण्याला कंटाळते पण विराेध करण्याच बळ तिच्या ठायि एकवटत नाही आणि लग्न नावाच्या महाप्रश्नापासुन ति पळायला लागते.

लहानपणी सगळयाच मुली बाहुली सारख्या सुंदर, रेखीव, नाजुक असतात, पण काही बाहुल्या शारिरिक जडणघडण, आनुवंशिकतेने उंचावत नाहीत आणि त्यांना ऊंचीच्या मुद्दयावर माघार घ्यावी लागते. विचारांची ऊंची, कर्तृत्वाची उंची काही केल्या दाखवता येत नाही त्यामुळे त्या कायम दुर्लक्षितच राहतात.

खुप सार्‍या परिमाणांच झापडं डाेळयावर घेऊन तिला बघायला जाताे आणि विचाराने आंधळे झालेले तिच्या ताेंडावर नाही पण मागुन नकार हा देतातच.

समीर क्षमा दत्तात्रय कडु (लाेणावळा)

PC;Google.com

Comments

Popular posts from this blog

अपेक्षाभंग

अपेक्षाभंगाच दु:ख खुप वाईट असते, खरच. कितीही नाही म्हंटल तरी, आपण ज्यासाठी काहीतरी करताे त्याबद्दल्यात तेवढं नाही पण थाेडीतरी परतफेड करावी. मग ती कुठलीही असाे प्रेम, भावन...

शब्द

बाेलताना खरच विचार करावा का?? नाही पडत ना आपल्याला कधी प्रश्न, बाेबडे बाेल बाेलता बाेलता आपण कधी शब्दरुपी विष आेकु लागताे आपल्यालाच कळत नाही. लहान असताना बालिश म्हणुन त्य...