फेसबुक सुटल, हाे हाे सुटलच. काेणी बाेल्ल का, काेणाला दाखवायच म्हणुन नाहीतर. कंटाळला जीव. फेसबुकमुळे खुप विचित्र सवयी लागत हाेत्या. तासन् तास ते ५ इंचाच्या स्क्रिनमध्ये डाेक खुपसुन बसायला लागत हाेत. दुसर्याच वाकुन बघायची तीव्र इच्छा व्हायची. समाेरच्याच्या प्रत्येक वागण्याला मी लाईक्स आणि कमेन्टनी मापत गेलाे. लाेक किती छान आयुष्य दाखवतात ना फेसबुकवर, अगदि एखादयाला हेवा वाटावा इतक. निल आर्मस्ट्राँग जसा चंद्रावर जाणारा पहिला माणुस हाेता तस हे पृथ्वीवरच्याच कुठल्यातरी काेपर्यात मीटरभर जावुन चेकइन करत असतात. खाताना साेनंचांदी खाताे असे डिशेसचे फाेटाे टाकताे. मित्रमैत्रीणिंना कधीही स्व:ताहुन मेसेज न करणारे, प्रत्येक फाेटाेत टॅग करायच कधीच विसरत नाहीत. किती आभासि जगताे ना, तुम्ही काय आणि मी काय आपण सगळयांनी थाेडयाफार फरकाने हेच केलय आणि करत राहु. खरच हयाची गरज आहे का, कधीतरी विचारु स्व:ताला प्रश्न. उत्तर नाहीच भेटल तर थाेडया दिवस लांब राहु, मन चलबिचल हाेईल, लक्ष जाईल अॅप कडे, सुंदर सुंदर फाेटाेज टाकायचा माेह हाेईलही. काेणी काय अपलाेड केलय हयाची लालसा हाेईल शेवटी इतक्या दिवसाच्या...