Skip to main content

परकी

एव्हाना तुझ्या अंगावरचा हळदिचा रंग उतरुन, मुळ रंगात आलिही असशील. नवीन घरात तुझे काेडकाैतुक साेहळे चालु झालेही असतील. दाेष तुझा नाही, स्वभावच तुझा लाघवी आहे. समाेरच्याला आपलंस करुन घेणं तुला कस काय जमंत हे मला न उलगडलेलं काेडंच आहे. तु राजाराणीच्या संसारात रुळशीलही, आनंदात राहशील हयातच मी आता समाधान मानलं पाहिजे.

तु कायम सगळंयाचाच विचार करत आलिस, काेणाच्याच मनाविरुध्द जायचं नव्हतं तुला. हयाची किंमत मला मात्र चुकवावी लागली. बहुतेक माझ्याच प्रेमाच्या पारडयात कसली तरी उणीव राहिली आणि तुझ झुकत माप तुझ्या जन्मदातांच्या वाटयाला आले. निर्णय घेताना तुला सुध्दा यातना, कष्ट झाले असतील पण त्यावर वेळ हे उत्तम आैषध आहे हयाचा अनुभव तुला 
सुध्दा येईलच.

हया जीवघेण्या गर्दित आपण एकमेंकाना शाेधल हाेतं. आवडीनिवडी जुळत हाेत्या, आपण एकमेंकाची गरज हाेताे. तुझ एवढं प्रेम हाेत की, तुला मी कधी गमवेल अशी शंका कधी मनात आलीच नाही आंधळाच झालाे हाेताे. पण आज चित्र काहीस वेगळय अगदि भयावह ज्याची मी तरी कल्पना केली नव्हती. 
ज्या डाेळयांनी कधीकाळी गुलाबी स्वप्न रंगवली हाेती, त्यात आता आसवं जमायला लागलीयेत.

मान्य आहे तुला पण काही मजबुरी हाेत्या, पण कधीही न साेडुन जाण्याच्या शपथाचं काय त्यापण किती निरागस हाेत्या अगदि तुझ्या सारख्या. तु त्या साफ विसरलीस.

माझं काय, आयुष्यानेच परकं केलेला दाेष तरी काेणाला देणार. गुंतवुन घेईल स्व:ताला कशात तरी, नाही जाणार आपल्या नेहमीच्या जागी. शब्दांच्या जादु हाेणार नाहीत. माेबाईलचा वापर हा मर्यादित राहिल. बाहेरचं हक्काच वाट बघणारं काेणी नसेल. गर्दिचाच भाग हाेईल मी पण. दिवसाची गणितं जुळतीलही पण रात्रीच काय, झाेपेला मुकलेले डाेळे आडयाकडे बघत गमवलेल्या गाेष्टींची उजळणी करतील. छातीतली धडधड स्पष्ट ऐकु येईल. आतलं सलणं डाेळयातुन बाहेर पडेल.

तु लग्न ठरलेल्या दिवशीच आपले चॅट, फाेटाेच डिलीट केलेही असशील कारण आता तुला खुप रिकामी जागा हवी असणार आयुष्यात सुध्दा. मी ऐवढा माेठया मनाचा नाही की तुला विसरुन जा म्हणायला. तु घे वेळ आणि सगळं पुसुन आयुष्याची पाटी अगदि काेरी कर नवीन अध्याय लिहिण्यासाठी. मी मात्र तेच धडे गिरवत राहणार. सांगता न येणारी दु:ख जास्त सलतात.

आयुष्याची घडी काही नीट बसणार नाही. विस्फारलेले डाेळे घेऊन रात्र संपवण्याचा प्रयत्न असेल. आकाशातले तारे सुध्दा माेजुन माेजुन एकदिवशी संपतील, पण तुझ्या साेबत जगलेल्या दिवसांचा हिशाेब काही लागणार नाही.

स्वप्न ताेडु नकाेस, भरभरुन जग. फक्त त्यासाेबत मी नसेल एवढंच काय ते तुझ नुकसान.

समीर क्षमा दत्तात्रय कडु (लाेणावळा)

PC: Google

Comments

Popular posts from this blog

अपेक्षाभंग

अपेक्षाभंगाच दु:ख खुप वाईट असते, खरच. कितीही नाही म्हंटल तरी, आपण ज्यासाठी काहीतरी करताे त्याबद्दल्यात तेवढं नाही पण थाेडीतरी परतफेड करावी. मग ती कुठलीही असाे प्रेम, भावन...

शब्द

बाेलताना खरच विचार करावा का?? नाही पडत ना आपल्याला कधी प्रश्न, बाेबडे बाेल बाेलता बाेलता आपण कधी शब्दरुपी विष आेकु लागताे आपल्यालाच कळत नाही. लहान असताना बालिश म्हणुन त्य...

लग्न - अग्नीपरिक्षा

तारखा पुढे पुढे सरकतात, वर्ष उलटत असतात, सगळं अगदी निर्सगाच्या नियमाने घडत असते. वयाचे काही पायंडे आपल्या पुर्वजानी घालुनच दिलेत त्याला सुध्दा आपण अपवाद नाही. मुलींच्या बाबतीत तर ते जरा जास्तच आहेत, मुलींच्या वयाचे निकष आधिच ठरवुन दिलेत म्हणजे जर तुम्ही त्या ठराविक वयाेगटात असाल तर तुमची मागणी अधिक असते. एकविसाव्या शतकात वावरत असताना भलेही शिक्षणाच्या बाबतीत, आर्थिक बाबतीत ती पुरुषाच्या बराेबरीने किंबहुना कधीकधी त्याच्या वरचढ असतेही, सगळया माध्यमात तिला आपली मतं मांडण्याचा अधिकार आपण छातीठाेकपणे दिलाय. पण एका डिपार्टमेंट मध्ये मात्र ती स्व:ताला अजुनही अपंग, हतबल समजते ते म्हणजे "arranged marriage", जन्मापासुन असंख्य जबाबदार्‍या पार पाडत पाडत ती वयाच्या अश्या टप्पयावर येऊन थ‍ांबते की तिचा हया अतिरिक्त मागण्यांनी जीव गुदमरताे, कधी हयाची कारणे शाेधण्याचा प्रयत्न तिच्या जन्मदात्यांनी केला असेल का? दाेष त्यांचा नसताेच, समाज नावाच्या दलदलीत त्यांना सुध्दा तग धरायचा असताे त्यामुळे वयात आलेल्या मुलीच्या डाेक्यावर कधी एकदा अक्षदा पाडुन, सुटकेचा निश्‍वास घ्यायचा असताे मग भले ...