Skip to main content

मिठी


मिठी

तुझ्या मिठित असताना माझा मात्र गाेंधळ हाेताे, नक्की ठाव काेणाच्या धडधडण्याचा घ्यावा. तुझं अत्तरही आता माझ्या अंगरख्यावर रेंगाळतय. ती आपल्या हातांची कैद कधी सुटुच नये, सुसाट्याच्या वारयासारखे वाहणारया श्वासांची, मंद झुळुक व्हावी. वेळ कासवाच्या गतीने पुढे सरकावा आणि भाेवतालच जग त्यात विरुन गेलेलं असावं.

समीर क्षमा दत्तात्रय कडु (लाेणावळा)
PC: Google

Comments

Popular posts from this blog

शब्द

बाेलताना खरच विचार करावा का?? नाही पडत ना आपल्याला कधी प्रश्न, बाेबडे बाेल बाेलता बाेलता आपण कधी शब्दरुपी विष आेकु लागताे आपल्यालाच कळत नाही. लहान असताना बालिश म्हणुन त्य...

अपेक्षाभंग

अपेक्षाभंगाच दु:ख खुप वाईट असते, खरच. कितीही नाही म्हंटल तरी, आपण ज्यासाठी काहीतरी करताे त्याबद्दल्यात तेवढं नाही पण थाेडीतरी परतफेड करावी. मग ती कुठलीही असाे प्रेम, भावन...

लग्न - अग्नीपरिक्षा

तारखा पुढे पुढे सरकतात, वर्ष उलटत असतात, सगळं अगदी निर्सगाच्या नियमाने घडत असते. वयाचे काही पायंडे आपल्या पुर्वजानी घालुनच दिलेत त्याला सुध्दा आपण अपवाद नाही. मुलींच्या बाबतीत तर ते जरा जास्तच आहेत, मुलींच्या वयाचे निकष आधिच ठरवुन दिलेत म्हणजे जर तुम्ही त्या ठराविक वयाेगटात असाल तर तुमची मागणी अधिक असते. एकविसाव्या शतकात वावरत असताना भलेही शिक्षणाच्या बाबतीत, आर्थिक बाबतीत ती पुरुषाच्या बराेबरीने किंबहुना कधीकधी त्याच्या वरचढ असतेही, सगळया माध्यमात तिला आपली मतं मांडण्याचा अधिकार आपण छातीठाेकपणे दिलाय. पण एका डिपार्टमेंट मध्ये मात्र ती स्व:ताला अजुनही अपंग, हतबल समजते ते म्हणजे "arranged marriage", जन्मापासुन असंख्य जबाबदार्‍या पार पाडत पाडत ती वयाच्या अश्या टप्पयावर येऊन थ‍ांबते की तिचा हया अतिरिक्त मागण्यांनी जीव गुदमरताे, कधी हयाची कारणे शाेधण्याचा प्रयत्न तिच्या जन्मदात्यांनी केला असेल का? दाेष त्यांचा नसताेच, समाज नावाच्या दलदलीत त्यांना सुध्दा तग धरायचा असताे त्यामुळे वयात आलेल्या मुलीच्या डाेक्यावर कधी एकदा अक्षदा पाडुन, सुटकेचा निश्‍वास घ्यायचा असताे मग भले ...