Skip to main content

आयुष्या पल्याड

आयुष्या पल्याड

दु:खाची चादर ऐवढी नरम आणि गरम असते की काही लाेकं ती कायमची पांघरुन घेतात. त्यात सगळेच त्यांच्यासाठी आसवं ढाळतात. पण कुठपर्यंत, जाे पर्यंत तुमच्याकडुन त्यांना इच्छित फायदा ताे पर्यंत. नंतर तुम्हाला लाेकं टाळतात.

करायच आहे तर स्व:त काहीतरी करा स्वत:साठी. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही अस म्हणतात. करुया ना धडपड, जावुयात ना खाचखळगयातुन. काहीही न करता आयुष्याची लख्तर हाेण्यापेक्षा, काहीतरी केल्याच समाधान मिळु दया ना. चांगले झाले तर जन्म सार्थकी आणि वाईट झाले तर दुसर्यांना दाेष तरी लागणार नाही, स्व: जबाबदार असाल.

परिणामांची पर्वा न करता, प्रमाणिक प्रयत्न करा. आपले भाेग आपणच भाेगुन संपवायचे असतात.  कम्फर्टझाेन नावाच वलय माेडुन टाका हाेवु दे हाल, अपेष्टा, उपसा की कष्ट. थाेडयाफार फरकाने आयुष्य जगण्याची मजा त्यातच आहे.
सुखाच्या मृगजळाचा पाठलाग करणे हे आपले ध्येय नसले, तरी आपल्या सगळ्यांना आयुष्यातली दु:खाची वजाबाकी करावीशी वाटतेच ना.

Life is beyond ur Comfort zone...


समीर क्षमा दत्तात्रय कडु (लाेणावळा)

Comments

Popular posts from this blog

अपेक्षाभंग

अपेक्षाभंगाच दु:ख खुप वाईट असते, खरच. कितीही नाही म्हंटल तरी, आपण ज्यासाठी काहीतरी करताे त्याबद्दल्यात तेवढं नाही पण थाेडीतरी परतफेड करावी. मग ती कुठलीही असाे प्रेम, भावन...

शब्द

बाेलताना खरच विचार करावा का?? नाही पडत ना आपल्याला कधी प्रश्न, बाेबडे बाेल बाेलता बाेलता आपण कधी शब्दरुपी विष आेकु लागताे आपल्यालाच कळत नाही. लहान असताना बालिश म्हणुन त्य...

लग्न - अग्नीपरिक्षा

तारखा पुढे पुढे सरकतात, वर्ष उलटत असतात, सगळं अगदी निर्सगाच्या नियमाने घडत असते. वयाचे काही पायंडे आपल्या पुर्वजानी घालुनच दिलेत त्याला सुध्दा आपण अपवाद नाही. मुलींच्या बाबतीत तर ते जरा जास्तच आहेत, मुलींच्या वयाचे निकष आधिच ठरवुन दिलेत म्हणजे जर तुम्ही त्या ठराविक वयाेगटात असाल तर तुमची मागणी अधिक असते. एकविसाव्या शतकात वावरत असताना भलेही शिक्षणाच्या बाबतीत, आर्थिक बाबतीत ती पुरुषाच्या बराेबरीने किंबहुना कधीकधी त्याच्या वरचढ असतेही, सगळया माध्यमात तिला आपली मतं मांडण्याचा अधिकार आपण छातीठाेकपणे दिलाय. पण एका डिपार्टमेंट मध्ये मात्र ती स्व:ताला अजुनही अपंग, हतबल समजते ते म्हणजे "arranged marriage", जन्मापासुन असंख्य जबाबदार्‍या पार पाडत पाडत ती वयाच्या अश्या टप्पयावर येऊन थ‍ांबते की तिचा हया अतिरिक्त मागण्यांनी जीव गुदमरताे, कधी हयाची कारणे शाेधण्याचा प्रयत्न तिच्या जन्मदात्यांनी केला असेल का? दाेष त्यांचा नसताेच, समाज नावाच्या दलदलीत त्यांना सुध्दा तग धरायचा असताे त्यामुळे वयात आलेल्या मुलीच्या डाेक्यावर कधी एकदा अक्षदा पाडुन, सुटकेचा निश्‍वास घ्यायचा असताे मग भले ...