Skip to main content

कसरत

लहानपणी अगदि राजकन्येसारखी नाही पण बर्‍यापैकी लाडाकाेडात वाढलेली मी, घरात पहिली मुलगी म्हणुन की काय हट्टीपणा माझ्यात रुळलाय पण ताे जबाबदार्‍यांच्या जाणिवेमुळे कमी सुध्दा झालाय. वय वाढत तस जबाबदार्‍या पण वाढतात त्याच बराेबर घरच्यांची इभ्रत, मान सांभाळत सांभाळत मी तारुण्य गाठलय. मला नेहमीच स्वावलंबी वाहयच हाेत. त्यासाठी फार नाही पण हाे त्याग केलाय मी, प्रसंगी घरच्यांपासुन लांब राहुन, आलेल्या कुठल्याही संकटांना ताेंड दिलय हे काय अगदि जगळावेगळ नाही केल पण हतबलता, निराशा माझ्या वाटयाला सुध्दा आलिये.

ठराविक वय झाल का प्रत्येक मुलीच्या जन्मदात्यांना जे टेन्शन असतं तस माझ्या सुध्दा हाेतं ते स्वाभाविकच असतं नाही का? मी कधिच त्यांच्या इच्छेच्या आड अाले नाही. जेव्हा त्यांच्या मनात आले तेव्हा स्वप्‍नांचा गाशा गुंडाळुन निमुटपणे बाेहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाले. जाेडीदारासाठीच्या अपेक्षांची यादि कधी मला करताच आली नाही.
कुठल्यातरी जन्माची पुण्याई शिल्लक म्हणुन तुझ्याशी बंध जुळले. तु प्रत्येक गाेष्टीत उजवा आहेस, तुझ्याशीच उरलेलं आयुष्य घालवायचय हा माझा कायम अट्टाहास राहिलच. किती छान जमत तुला माझा बालिश मुड संभाळण. लग्नानंतरचा तुझ्यातला कुठलाच बदल मला रुचणार न्हवता, पण मी बघ सगळी नाती, माझं माहेर आणि माझ आडनाव सुध्दा बदलुन आले. माझ्या नावानंतरच तुझ नाव मला जास्त जवळच आहे. देवाब्राह्‍मणांच्या साक्षिने आपण एकमेकांचे झालाे, सप्तपदिच्या वेळेस घेतलेली वचने तु आयुष्यभर पुर्ण करशील हा अढळ विश्‍वास आहे.

लक्ष्मीच्या पावलाने मी माप आेलांडुन तुझ्या नाही आपल्या घरात आले. सगळेच माझे आहेत, माहेरात साेडुन आलेली नाती मी आपल्या घरात शाेधतेय. सासुला मी म्ममीच म्हणार, मांमजी/सासरे नावाचा कडक माणुस नाहीतर पप्पा नावाचा लाड पुरवणारा हवा, काष्ट ननंद माझी ती आता बहीण हाेणारे जिची कमी मी पुर्ण करण्याचा अताेनात प्रयत्न करेल.
माहेरपणातल सैरावरा वागणं मला नाही जगता येणार, मला मान्य आहेत माझ्या हया नवीन घरातल्या मर्यादा, नियम मी पाळेल सुध्दा. चांगले बदल घडायला थाेडा वेळ हा लागताेच ना रे, तस मलाही अॅडजेस्ट व्हायला उशीर हाेईल. कधी भाजीत तिखट जास्त हाेईल, तर कधी वरणात मीठ कमी असेल शेवटी माणुसच ना मी. मी पुर्णत्व नाही, अवगुण माझ्या अंगी सुध्दा आहेतच ना, त्या म्मी/प्पांनी सुक्ष्म भिंगातुन पाहु नये आणि सारखी उजळणी करु नये हिच माझी माफक अपेक्षा कारण मला त्यांची सुन म्हणुन नाही तर त्यांची मुलगी म्हणुन रहायचय. ताईंना आहेत तेवढे हक्क नकाेच आणि त्यांची जागा सुध्दा घ्यायची नाही. माझ्यातील गुणदाेष बाजुला सारण्यासाठी त्यांनी माझ्यावर हक्काने चिडाव, वेळप्रसंगी चार वर्मी लागणारे शब्द सुध्द‍ा बाेलावे पण रुसुन, मनात अडी धरु नये ऐवढीच माझी अपेक्षा. त्या गाेष्टींची टाेचण सारखी मनाला लागुन राहते रे.

माझा सुर कधी कधी तुला तक्रारीसारखा वाटेलही. तु खुप संभाळुन घेताेस आम्हाला सगळ्यांना. मला तुझं मधल्यामधे मरण करायच नाही, नाती जपण्यात कसली आलिये स्पर्धा. तुझी तारेवरची कसरत मला दिसत नाही अस नाही. पण मी ८-९ तास काम करुन थकलेलं शरीर घेवुन जेव्हा घरी येते तेव्हा किचनच्या कुठल्यातरी काेपर्‍यात ठेवलेला भांड्यांचा ढिगारा माझ्याकडे हतबल हाेवुन पाहत असताे. न दिसणार घडयाळ कायम माझ्या मनगटाला बांधल गेलय त्या नुसार मला पळावच लागतं. सगळयाच गाेष्टी मी तुला सांगण बर नाही, कारण टाळी एका हाताने कधीच वाजत नाही. बायकांच्या खुरबुरीत काेण चुक, काेण बराेबर हयाचा निकष लागण थाेड अवघडच आहे.
मला काेणीही सुखात घाेळवु नये की तुपात तळु नये, माझ्या एकटीमुळे काेणात सुध्दा बदल हाेता कामा नये. मी पण काेणाची तरी मुलगी आहे याच भान घरातल्या बाकी मंडळीनी ठेवुन वागावं. एका छताखाली राहणार्‍यांची ताेंड वेगवेगळ्या दिशेला असणं चांगल नसते. नाती ही लवचिक असली तरी त्यांवर जास्त ताण देवु नये नाहीतर तुटायला वेळ लागत नाही.

तु सुध्दा कधी तरी नेहमीपेक्षा लवकर ये, दर रविवारी नाही पण कधीतरी बाहेर जावु ना रे.
आणि आपल्या राजाराणीच्या संसाराच लक्षात असु दे हयाला प्रेमळ धमकी समज.

घर म्हटंल का भांडयाला भांड लागणारच फक्त ती दाेन्ही भांडी एकदम चेंबु नये म्हणजे झाल. बाकी मी आहे ना संभाळुन घ्यायला.
तेवढं तु एखादया रविवारच बघ त्यांची परवानगी घेवुन.

समीर क्षमा दत्तात्रय कडु (लाेणावळा)


Comments

Popular posts from this blog

अपेक्षाभंग

अपेक्षाभंगाच दु:ख खुप वाईट असते, खरच. कितीही नाही म्हंटल तरी, आपण ज्यासाठी काहीतरी करताे त्याबद्दल्यात तेवढं नाही पण थाेडीतरी परतफेड करावी. मग ती कुठलीही असाे प्रेम, भावन...

शब्द

बाेलताना खरच विचार करावा का?? नाही पडत ना आपल्याला कधी प्रश्न, बाेबडे बाेल बाेलता बाेलता आपण कधी शब्दरुपी विष आेकु लागताे आपल्यालाच कळत नाही. लहान असताना बालिश म्हणुन त्य...

लग्न - अग्नीपरिक्षा

तारखा पुढे पुढे सरकतात, वर्ष उलटत असतात, सगळं अगदी निर्सगाच्या नियमाने घडत असते. वयाचे काही पायंडे आपल्या पुर्वजानी घालुनच दिलेत त्याला सुध्दा आपण अपवाद नाही. मुलींच्या बाबतीत तर ते जरा जास्तच आहेत, मुलींच्या वयाचे निकष आधिच ठरवुन दिलेत म्हणजे जर तुम्ही त्या ठराविक वयाेगटात असाल तर तुमची मागणी अधिक असते. एकविसाव्या शतकात वावरत असताना भलेही शिक्षणाच्या बाबतीत, आर्थिक बाबतीत ती पुरुषाच्या बराेबरीने किंबहुना कधीकधी त्याच्या वरचढ असतेही, सगळया माध्यमात तिला आपली मतं मांडण्याचा अधिकार आपण छातीठाेकपणे दिलाय. पण एका डिपार्टमेंट मध्ये मात्र ती स्व:ताला अजुनही अपंग, हतबल समजते ते म्हणजे "arranged marriage", जन्मापासुन असंख्य जबाबदार्‍या पार पाडत पाडत ती वयाच्या अश्या टप्पयावर येऊन थ‍ांबते की तिचा हया अतिरिक्त मागण्यांनी जीव गुदमरताे, कधी हयाची कारणे शाेधण्याचा प्रयत्न तिच्या जन्मदात्यांनी केला असेल का? दाेष त्यांचा नसताेच, समाज नावाच्या दलदलीत त्यांना सुध्दा तग धरायचा असताे त्यामुळे वयात आलेल्या मुलीच्या डाेक्यावर कधी एकदा अक्षदा पाडुन, सुटकेचा निश्‍वास घ्यायचा असताे मग भले ...