Skip to main content

बाजीगर

तिच्यासाठी देवळात जाणारा, तिचा प्रत्येक शब्द झेलणारा, तिच्यासाठी कईक शपथा घेतलेल्या. तिच्यासाठी सारे जमाने से विरुध्द हाेणारा, एक जिस्म दाेन जानवाला, हार्डकाेर लव्हर हाेता.

साता जन्मापासुन नात असल्यासारख प्रेमात बुडालेले. तिच बहुतेक पहिलच असावं, ताे मात्र हया क्षेत्रात पारंगतच. प्रियकर-प्रेयसीच्या जबाबदार्या दाेघं नेटाने पार पाडत हाेते, दाेघ ऐकमेकांसाठी आधार का काय हाेते. २-४ वर्ष अगदि सुखात परिकथेसारखी गेली.

हळु-हळु दाेघं एकमेकांना "चांगलेच" आेळखायला लागले. ताे जास्तच possesive झाला, तिला पण त्याच छाेटया छाेटया गाेष्टीत लक्ष देणं खटकायला लागल. तिला स्पेस आणि फ्रिडम हवा हाेता. ती त्याला टाळु लागली. खटके उडायला लागले. त्याच्यासाेबत रिलेश्नशीपमध्ये येण्याचा निर्णय चुकीचा हाेता हे तिला कळु लागल, त्याला हया सगळ्या परिणामांची कल्पना हाेतीच, त्याच्या खिशात असे कितीतरी अनुभव घालुन पाेरी निघुन गेल्या हाेत्या.

म्युचयल अनडरस्टँन्डीन्गने दाेघांनी ब्रेक घ्याच ठरवल. ताे काळ ऐवढा वाढला की, त्याचं तुटलं. ताे काय कच्चा गुरुचा चेला नव्हता ताे काही गम-बिम वगैरे मध्ये बुडला नाही. तिच पुढे काय झाल माहित नाही, हयानी तिचे मेसेज, फाेटाेज बॅकअप घेऊन आयुष्यातुन फाॅरमेट केल.

त्यादिवशी सहजच भेटला, तिच्याबराेबरचे किस्से "रंगवुन-रंगवुन" सांगत हाेता. तिच्या साेबत मज्जा करुन साेडुन दिल्याचा अासुरी आनंद त्याच्या चेहरयावर स्पष्ट दिसत हाेता.

आणि ती बिच्चारी आपण काेणाला तरी एकट साेडलय, हया गाेष्टीच आेझं घेऊन रात्री जागवत असेल.
आता हे बेन नवीन पाेरींचे नंबर मागत फिरतय.
हार कर बी हारने वाला "बाजीगर"

समीर क्षमा दत्तात्रय कडु (लाेणावळा)

PC: Google


Comments

Popular posts from this blog

अपेक्षाभंग

अपेक्षाभंगाच दु:ख खुप वाईट असते, खरच. कितीही नाही म्हंटल तरी, आपण ज्यासाठी काहीतरी करताे त्याबद्दल्यात तेवढं नाही पण थाेडीतरी परतफेड करावी. मग ती कुठलीही असाे प्रेम, भावन...

शब्द

बाेलताना खरच विचार करावा का?? नाही पडत ना आपल्याला कधी प्रश्न, बाेबडे बाेल बाेलता बाेलता आपण कधी शब्दरुपी विष आेकु लागताे आपल्यालाच कळत नाही. लहान असताना बालिश म्हणुन त्य...

लग्न - अग्नीपरिक्षा

तारखा पुढे पुढे सरकतात, वर्ष उलटत असतात, सगळं अगदी निर्सगाच्या नियमाने घडत असते. वयाचे काही पायंडे आपल्या पुर्वजानी घालुनच दिलेत त्याला सुध्दा आपण अपवाद नाही. मुलींच्या बाबतीत तर ते जरा जास्तच आहेत, मुलींच्या वयाचे निकष आधिच ठरवुन दिलेत म्हणजे जर तुम्ही त्या ठराविक वयाेगटात असाल तर तुमची मागणी अधिक असते. एकविसाव्या शतकात वावरत असताना भलेही शिक्षणाच्या बाबतीत, आर्थिक बाबतीत ती पुरुषाच्या बराेबरीने किंबहुना कधीकधी त्याच्या वरचढ असतेही, सगळया माध्यमात तिला आपली मतं मांडण्याचा अधिकार आपण छातीठाेकपणे दिलाय. पण एका डिपार्टमेंट मध्ये मात्र ती स्व:ताला अजुनही अपंग, हतबल समजते ते म्हणजे "arranged marriage", जन्मापासुन असंख्य जबाबदार्‍या पार पाडत पाडत ती वयाच्या अश्या टप्पयावर येऊन थ‍ांबते की तिचा हया अतिरिक्त मागण्यांनी जीव गुदमरताे, कधी हयाची कारणे शाेधण्याचा प्रयत्न तिच्या जन्मदात्यांनी केला असेल का? दाेष त्यांचा नसताेच, समाज नावाच्या दलदलीत त्यांना सुध्दा तग धरायचा असताे त्यामुळे वयात आलेल्या मुलीच्या डाेक्यावर कधी एकदा अक्षदा पाडुन, सुटकेचा निश्‍वास घ्यायचा असताे मग भले ...