Skip to main content

कल्पतरु

कधी कधी वाटत... अगदि लहान असल्यासारखं तिला घट्ट मिठी मारुन ढसाढसा रडावं. लहानपणापासुन आतापर्यंत आपल्यामुळे झालेला त्रास, मनस्ताप हयाचि उजळणी करुन माफी मागावी.


रागात आपल्या ताेंडातुन निघालेले धारधार शब्द किती लागले असतील ना तिच्या मनाला. जन्माला येवुन तिचा वांझाेटापणा दुर करुन तिच्यावर उपकार केल्यासारखे आपण वागताे. किती सहज गृहित धरताे आपण तिला. तिच्या इच्छा-अपेक्षांची यादि तेव्हाच फाडुन फेकुन दिली जेव्हा आपला जन्म झाला. अख्ख आयुष्य वेचल तिने आपल्याला घडवण्यात, बदल्यात कसलीच अपेक्षा न ठेवता. तरी आपण जरा कुठे कमी पडले का शहाणपणाचे धडे गिरवताे. घालुन पाडुन बाेल्ल का आपल्या कसं बरं वाटत.

आपल्या पंखात जिने बळ भरलयं. तिच आपल्या मायेला पारखी झालिये. कितीही नालायक असलाेतरी बापासमाेर वकीली तीच करते. तुमचं कस हाेणार हया विचारांच आेझ घेऊन ती हया वयात रात्रिची कुस बदलते. आपण मात्र तिला दुखवुन सुध्दा साखरझाेपेत असताे.

वयाेमानानुसार ती सुध्दा खुप थकलीये. खुप शारिरिक वेदना तिला सुध्दा खुपतायेत पण त्याची झळ तुम्हाला कधीच बसु देणार नाही. आपण माेठ हाेण्याच्या नादात तिच्यापासुन तुटत चाललाेय. ती नाही कधी बाेलुन दाखवत पण फक्त तिच्या डाेळ्यात नीट बघा तुमच्या बद्दलची काळजी अजुनही त्या थकलेल्या डाेळयात तशीच गाेठुन आहे.

तिने जे केलंय ते आपल्यासाठीच हाेतं, ति जे करतीये ते आपल्यासाठीच आहे आपल्याला त्याची तसुभरही कदर नाही हा भाग वेगळा. नशिबाने भेटलेली तिच एक अशी व्यक्‍ती आहे जिची जागा काेणीच घेऊ शकत नाही.

तिला जवळ घेवुन सांगायचय, बास झाल आता तुझ तिळतिळ तुटणं सगळयांसाठी. जग ना स्व:तासाठी. गुदमरुदे ना जीव आमचासुध्दा हया जीवघेण्या गर्दीत. काही नाही करता अाले तरी तुझी मायेची आेझंळ आहेच ना परत. फक्त तुझ्या डाेळ्यात समाधानाची चमक दिसावी हिच काय ती इच्छा.

पुढच्या जन्मी कुठलाही जीव भेटु दे, फक्त ताे तुझ्या पाेटी असु दे. तुझ्या गर्भाइतकी सुरक्षितता हया जगात कशालाच नाही.

#कल्पतरु - आई

समीर क्षमा दत्तात्रय कडु (लाेणावळा)

PC;Google.com

Comments

Popular posts from this blog

अपेक्षाभंग

अपेक्षाभंगाच दु:ख खुप वाईट असते, खरच. कितीही नाही म्हंटल तरी, आपण ज्यासाठी काहीतरी करताे त्याबद्दल्यात तेवढं नाही पण थाेडीतरी परतफेड करावी. मग ती कुठलीही असाे प्रेम, भावन...

शब्द

बाेलताना खरच विचार करावा का?? नाही पडत ना आपल्याला कधी प्रश्न, बाेबडे बाेल बाेलता बाेलता आपण कधी शब्दरुपी विष आेकु लागताे आपल्यालाच कळत नाही. लहान असताना बालिश म्हणुन त्य...

लग्न - अग्नीपरिक्षा

तारखा पुढे पुढे सरकतात, वर्ष उलटत असतात, सगळं अगदी निर्सगाच्या नियमाने घडत असते. वयाचे काही पायंडे आपल्या पुर्वजानी घालुनच दिलेत त्याला सुध्दा आपण अपवाद नाही. मुलींच्या बाबतीत तर ते जरा जास्तच आहेत, मुलींच्या वयाचे निकष आधिच ठरवुन दिलेत म्हणजे जर तुम्ही त्या ठराविक वयाेगटात असाल तर तुमची मागणी अधिक असते. एकविसाव्या शतकात वावरत असताना भलेही शिक्षणाच्या बाबतीत, आर्थिक बाबतीत ती पुरुषाच्या बराेबरीने किंबहुना कधीकधी त्याच्या वरचढ असतेही, सगळया माध्यमात तिला आपली मतं मांडण्याचा अधिकार आपण छातीठाेकपणे दिलाय. पण एका डिपार्टमेंट मध्ये मात्र ती स्व:ताला अजुनही अपंग, हतबल समजते ते म्हणजे "arranged marriage", जन्मापासुन असंख्य जबाबदार्‍या पार पाडत पाडत ती वयाच्या अश्या टप्पयावर येऊन थ‍ांबते की तिचा हया अतिरिक्त मागण्यांनी जीव गुदमरताे, कधी हयाची कारणे शाेधण्याचा प्रयत्न तिच्या जन्मदात्यांनी केला असेल का? दाेष त्यांचा नसताेच, समाज नावाच्या दलदलीत त्यांना सुध्दा तग धरायचा असताे त्यामुळे वयात आलेल्या मुलीच्या डाेक्यावर कधी एकदा अक्षदा पाडुन, सुटकेचा निश्‍वास घ्यायचा असताे मग भले ...