Skip to main content

Posts

Showing posts from April, 2017

परकी

एव्हाना तुझ्या अंगावरचा हळदिचा रंग उतरुन, मुळ रंगात आलिही असशील. नवीन घरात तुझे काेडकाैतुक साेहळे चालु झालेही असतील. दाेष तुझा नाही, स्वभावच तुझा लाघवी आहे. समाेरच्याला आपलंस करुन घेणं तुला कस काय जमंत हे मला न उलगडलेलं काेडंच आहे. तु राजाराणीच्या संसारात रुळशीलही, आनंदात राहशील हयातच मी आता समाधान मानलं पाहिजे. तु कायम सगळंयाचाच विचार करत आलिस, काेणाच्याच मनाविरुध्द जायचं नव्हतं तुला. हयाची किंमत मला मात्र चुकवावी लागली. बहुतेक माझ्याच प्रेमाच्या पारडयात कसली तरी उणीव राहिली आणि तुझ झुकत माप तुझ्या जन्मदातांच्या वाटयाला आले. निर्णय घेताना तुला सुध्दा यातना, कष्ट झाले असतील पण त्यावर वेळ हे उत्तम आैषध आहे हयाचा अनुभव तुला  सुध्दा येईलच. हया जीवघेण्या गर्दित आपण एकमेंकाना शाेधल हाेतं. आवडीनिवडी जुळत हाेत्या, आपण एकमेंकाची गरज हाेताे. तुझ एवढं प्रेम हाेत की, तुला मी कधी गमवेल अशी शंका कधी मनात आलीच नाही आंधळाच झालाे हाेताे. पण आज चित्र काहीस वेगळय अगदि भयावह ज्याची मी तरी कल्पना केली नव्हती.  ज्या डाेळयांनी कधीकाळी गुलाबी स्वप्न रंगवली हाेती, त्यात आता आसवं जमायला लागल

आयुष्या पल्याड

आयुष्या पल्याड दु:खाची चादर ऐवढी नरम आणि गरम असते की काही लाेकं ती कायमची पांघरुन घेतात. त्यात सगळेच त्यांच्यासाठी आसवं ढाळतात. पण कुठपर्यंत, जाे पर्यंत तुमच्याकडुन त्यांना इच्छित फायदा ताे पर्यंत. नंतर तुम्हाला लाेकं टाळतात. करायच आहे तर स्व:त काहीतरी करा स्वत:साठी. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही अस म्हणतात. करुया ना धडपड, जावुयात ना खाचखळगयातुन. काहीही न करता आयुष्याची लख्तर हाेण्यापेक्षा, काहीतरी केल्याच समाधान मिळु दया ना. चांगले झाले तर जन्म सार्थकी आणि वाईट झाले तर दुसर्यांना दाेष तरी लागणार नाही, स्व: जबाबदार असाल. परिणामांची पर्वा न करता, प्रमाणिक प्रयत्न करा. आपले भाेग आपणच भाेगुन संपवायचे असतात.  कम्फर्टझाेन नावाच वलय माेडुन टाका हाेवु दे हाल, अपेष्टा, उपसा की कष्ट. थाेडयाफार फरकाने आयुष्य जगण्याची मजा त्यातच आहे. सुखाच्या मृगजळाचा पाठलाग करणे हे आपले ध्येय नसले, तरी आपल्या सगळ्यांना आयुष्यातली दु:खाची वजाबाकी करावीशी वाटतेच ना. Life is beyond ur Comfort zone... समीर क्षमा दत्तात्रय कडु (लाेणावळा)

मिठी

मिठी तुझ्या मिठित असताना माझा मात्र गाेंधळ हाेताे, नक्की ठाव काेणाच्या धडधडण्याचा घ्यावा. तुझं अत्तरही आता माझ्या अंगरख्यावर रेंगाळतय. ती आपल्या हातांची कैद कधी सुटुच नये, सुसाट्याच्या वारयासारखे वाहणारया श्वासांची, मंद झुळुक व्हावी. वेळ कासवाच्या गतीने पुढे सरकावा आणि भाेवतालच जग त्यात विरुन गेलेलं असावं. समीर क्षमा दत्तात्रय कडु (लाेणावळा) PC: Google

कसरत

लहानपणी अगदि राजकन्येसारखी नाही पण बर्‍यापैकी लाडाकाेडात वाढलेली मी, घरात पहिली मुलगी म्हणुन की काय हट्टीपणा माझ्यात रुळलाय पण ताे जबाबदार्‍यांच्या जाणिवेमुळे कमी सुध्दा झालाय. वय वाढत तस जबाबदार्‍या पण वाढतात त्याच बराेबर घरच्यांची इभ्रत, मान सांभाळत सांभाळत मी तारुण्य गाठलय. मला नेहमीच स्वावलंबी वाहयच हाेत. त्यासाठी फार नाही पण हाे त्याग केलाय मी, प्रसंगी घरच्यांपासुन लांब राहुन, आलेल्या कुठल्याही संकटांना ताेंड दिलय हे काय अगदि जगळावेगळ नाही केल पण हतबलता, निराशा माझ्या वाटयाला सुध्दा आलिये. ठराविक वय झाल का प्रत्येक मुलीच्या जन्मदात्यांना जे टेन्शन असतं तस माझ्या सुध्दा हाेतं ते स्वाभाविकच असतं नाही का? मी कधिच त्यांच्या इच्छेच्या आड अाले नाही. जेव्हा त्यांच्या मनात आले तेव्हा स्वप्‍नांचा गाशा गुंडाळुन निमुटपणे बाेहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाले. जाेडीदारासाठीच्या अपेक्षांची यादि कधी मला करताच आली नाही. कुठल्यातरी जन्माची पुण्याई शिल्लक म्हणुन तुझ्याशी बंध जुळले. तु प्रत्येक गाेष्टीत उजवा आहेस, तुझ्याशीच उरलेलं आयुष्य घालवायचय हा माझा कायम अट्टाहास राहिलच. किती छान जमत तुला मा

काेपर्डीतली ती

"काेपर्डीतली ती" असाच जुना पेपर चाळताना ती "काेपर्डी"ची बातमी नजरेला आली. सगळ्याच घटना आपण किती पटकन विसरताे ना. आपल्या साेबत प्रसार माध्यमांना सुध्दा वेगवेगळे विषय भेटलेत चघळायला. अस काही झाल का किती चटकन प्रतिक्रिया देताे ना आपण. फेसबुकवर माेठेच्या माेठे रकाने गिरवले, ठळक घडामाेडींमध्ये ती झळकलीही. न्युजरुम मध्ये वाॅर झाले. नेते मंडळींची पायधुळ तिच्या उंबरठयाला लागली. कितीतरी माैर्चे निघाले सगळं समाजमन अगदि ढवळुन निघाले. आम्ही हया व्यतिरिक्त काहीच करु शकत नाही. पुढे काय झाल तुझ्या बाबतीत माहिती नाही. तुझ्या केसची फाईल कुठेतरी अडगळीत धुळ खात असेल. तुझ्या आठवणी विरुन चालल्यात. तुझे घरचे खुप सार्‍या गाेष्टींची झगडत असतील. आम्ही आमच्या खाजगी आयुष्यात खुप व्यस्त आहाेत. राेज पेपरात तुझ्याशी मिळतीजुळती बातमी असतेच. ती ऐकुन आमचं ह्दय पिळवटुन निघतं. चर्चा हाेतात, दिवस पुढे सरकत जाताे आणि काहीच बदलत नाही. मी तर नेहमी ते हाेण्या मागची कारणे शाेधत असताे. डाेक्यात विचारांची रांग लागते. सगळयांसारखाच मी सुध्दा हतबल हाेताे. करणारे सुध्दा आमच्यासारखे साे काॅल्ड पुरुष हाेते