Skip to main content

Posts

Showing posts from December, 2017

सरते वर्ष

प्रत्येक वर्षीसारख हे वर्ष पण त्याच्या गतीनेच सरकले. चांगले - वाईट अनुभव तारखांचे लेबल लावुन भुतकाळात गुरफटुन पडलेत, पुढे जावुन आठवणी नावाचा साज लेवुन सुखावण्याच काम करतीलच. काही माेरपंखासारखे मखमलित हाेते तर काही निवडुंगाच्या काटयांसारखे तिक्ष्ण, धारधार. अगदि खाेलवर जख्म हाेवुन व्रर्ण साेडणारे. पश्चातापांच्या अश्रुंनी कुस बदलुन कितीतरी रात्री माेठया केल्यात. सकाळचं खाेटं-खाेटं हसु हे राेजच्या जगण्याचा भाग झालाय. मनगटावर अडकवलेल घडयाळ त्याच्या साेयीनुसार नाचवतय. अपेक्षाभंगाच दु:ख स्वत:ला निल्लर्ज आणि हतबल बनवते. आयुष्याची गणितं जुळुन येत नाहीत आणि जबाबदार्‍यांचा पसारा वाढताेय. न घडलेल्या गाेष्टींचा हक्क हा कमनशीबाचा भाग हाेता. खुप सार्‍या तक्रारींचा सुर आळवुन हे वर्ष त्याची कात बदलुन नवीन रुप घेईल. कळत-नकळत ज्यांनी दुखावल त्यांना न मागताच माफी, आणि आपल्यालामुळे जे दुखावलेत त्यांनी क्षमस्व असावे. नवीन वर्षात काय-काय करायच हयाचा संकल्प काही अजुन झालेला नाही, पण काय नाही करायच हयाची मात्र पक्की खुणगाठ मनाशी बांधलेली आहे. सरते शेवटी आलेल्यांना सामाेरे जायचे आणि शहाणपणात वाढ करुन घ्याय