Skip to main content

सरते वर्ष

प्रत्येक वर्षीसारख हे वर्ष पण त्याच्या गतीनेच सरकले. चांगले - वाईट अनुभव तारखांचे लेबल लावुन भुतकाळात गुरफटुन पडलेत, पुढे जावुन आठवणी नावाचा साज लेवुन सुखावण्याच काम करतीलच. काही माेरपंखासारखे मखमलित हाेते तर काही निवडुंगाच्या काटयांसारखे तिक्ष्ण, धारधार. अगदि खाेलवर जख्म हाेवुन व्रर्ण साेडणारे.

पश्चातापांच्या अश्रुंनी कुस बदलुन कितीतरी रात्री माेठया केल्यात. सकाळचं खाेटं-खाेटं हसु हे राेजच्या जगण्याचा भाग झालाय. मनगटावर अडकवलेल घडयाळ त्याच्या साेयीनुसार नाचवतय. अपेक्षाभंगाच दु:ख स्वत:ला निल्लर्ज आणि हतबल बनवते.

आयुष्याची गणितं जुळुन येत नाहीत आणि जबाबदार्‍यांचा पसारा वाढताेय. न घडलेल्या गाेष्टींचा हक्क हा कमनशीबाचा भाग हाेता. खुप सार्‍या तक्रारींचा सुर आळवुन हे वर्ष त्याची कात बदलुन नवीन रुप घेईल.

कळत-नकळत ज्यांनी दुखावल त्यांना न मागताच माफी, आणि आपल्यालामुळे जे दुखावलेत त्यांनी क्षमस्व असावे.

नवीन वर्षात काय-काय करायच हयाचा संकल्प काही अजुन झालेला नाही, पण काय नाही करायच हयाची मात्र पक्की खुणगाठ मनाशी बांधलेली आहे.

सरते शेवटी आलेल्यांना सामाेरे जायचे आणि शहाणपणात वाढ करुन घ्यायची...

HAPPY NEW YEAR.....

Comments

Popular posts from this blog

लग्न - अग्नीपरिक्षा

तारखा पुढे पुढे सरकतात, वर्ष उलटत असतात, सगळं अगदी निर्सगाच्या नियमाने घडत असते. वयाचे काही पायंडे आपल्या पुर्वजानी घालुनच दिलेत त्याला सुध्दा आपण अपवाद नाही. मुलींच्या बाबतीत तर ते जरा जास्तच आहेत, मुलींच्या वयाचे निकष आधिच ठरवुन दिलेत म्हणजे जर तुम्ही त्या ठराविक वयाेगटात असाल तर तुमची मागणी अधिक असते. एकविसाव्या शतकात वावरत असताना भलेही शिक्षणाच्या बाबतीत, आर्थिक बाबतीत ती पुरुषाच्या बराेबरीने किंबहुना कधीकधी त्याच्या वरचढ असतेही, सगळया माध्यमात तिला आपली मतं मांडण्याचा अधिकार आपण छातीठाेकपणे दिलाय. पण एका डिपार्टमेंट मध्ये मात्र ती स्व:ताला अजुनही अपंग, हतबल समजते ते म्हणजे "arranged marriage", जन्मापासुन असंख्य जबाबदार्‍या पार पाडत पाडत ती वयाच्या अश्या टप्पयावर येऊन थ‍ांबते की तिचा हया अतिरिक्त मागण्यांनी जीव गुदमरताे, कधी हयाची कारणे शाेधण्याचा प्रयत्न तिच्या जन्मदात्यांनी केला असेल का? दाेष त्यांचा नसताेच, समाज नावाच्या दलदलीत त्यांना सुध्दा तग धरायचा असताे त्यामुळे वयात आलेल्या मुलीच्या डाेक्यावर कधी एकदा अक्षदा पाडुन, सुटकेचा निश्‍वास घ्यायचा असताे मग भले

काेपर्डीतली ती

"काेपर्डीतली ती" असाच जुना पेपर चाळताना ती "काेपर्डी"ची बातमी नजरेला आली. सगळ्याच घटना आपण किती पटकन विसरताे ना. आपल्या साेबत प्रसार माध्यमांना सुध्दा वेगवेगळे विषय भेटलेत चघळायला. अस काही झाल का किती चटकन प्रतिक्रिया देताे ना आपण. फेसबुकवर माेठेच्या माेठे रकाने गिरवले, ठळक घडामाेडींमध्ये ती झळकलीही. न्युजरुम मध्ये वाॅर झाले. नेते मंडळींची पायधुळ तिच्या उंबरठयाला लागली. कितीतरी माैर्चे निघाले सगळं समाजमन अगदि ढवळुन निघाले. आम्ही हया व्यतिरिक्त काहीच करु शकत नाही. पुढे काय झाल तुझ्या बाबतीत माहिती नाही. तुझ्या केसची फाईल कुठेतरी अडगळीत धुळ खात असेल. तुझ्या आठवणी विरुन चालल्यात. तुझे घरचे खुप सार्‍या गाेष्टींची झगडत असतील. आम्ही आमच्या खाजगी आयुष्यात खुप व्यस्त आहाेत. राेज पेपरात तुझ्याशी मिळतीजुळती बातमी असतेच. ती ऐकुन आमचं ह्दय पिळवटुन निघतं. चर्चा हाेतात, दिवस पुढे सरकत जाताे आणि काहीच बदलत नाही. मी तर नेहमी ते हाेण्या मागची कारणे शाेधत असताे. डाेक्यात विचारांची रांग लागते. सगळयांसारखाच मी सुध्दा हतबल हाेताे. करणारे सुध्दा आमच्यासारखे साे काॅल्ड पुरुष हाेते