Skip to main content

Posts

Showing posts from May, 2017

रिमा लागु

चित्रपटातील आईच्या भुमिका सार्थ निभावण्याची क्षमता ज्या थाेडया अभिनेत्रींमध्ये आहे त्या यादि मधल्या एक म्हणजे "रिमा लागु"... तुमच्या अभिनयाच्या कक्षा फक्त मराठीपर्यंतच मर्यादित न राहता त्या हिंदी सृष्टीत सुध्दा पसरवल्या. श्रीमान-श्रीमती मधली ती भाेळसट बायकाे,  तुतु-मैंमै मधली नाटाळ-अवखळ सासु अजुनही आमच्या ठळक लक्षात आहेत. मैंने प्यार किया, आशिकी, साजन, हम आपके है काेैन, कल हाे ना हाे, कुछ कुछ हाेता है हयात तुम्ही वठवलेल्या भुमिकेत मायेचा आेलाव जास्त हाेता. नाटक रंगभुमीवरचा तुमचा वावर सांगता येणार नाही इतका विस्तीर्ण आहे. हिंदी पडदयावर तुम्हाला बघितला का अभिमान जरा जास्त वाटायचा. चंंदेरी दुनियेतल्या तसेच खाजगी आयुष्यातल्या विविध भुमिका पार पाडता पाडता तुमची झालेली एक्झिट थाेडी चटका लावणारी आहे. ईश्वर तुमच्या आत्मयास शांती देवाे.... समीर क्षमा दत्तात्रय कडु (लाेणावळा) PC: Google.co.in

लग्न - अग्नीपरिक्षा

तारखा पुढे पुढे सरकतात, वर्ष उलटत असतात, सगळं अगदी निर्सगाच्या नियमाने घडत असते. वयाचे काही पायंडे आपल्या पुर्वजानी घालुनच दिलेत त्याला सुध्दा आपण अपवाद नाही. मुलींच्या बाबतीत तर ते जरा जास्तच आहेत, मुलींच्या वयाचे निकष आधिच ठरवुन दिलेत म्हणजे जर तुम्ही त्या ठराविक वयाेगटात असाल तर तुमची मागणी अधिक असते. एकविसाव्या शतकात वावरत असताना भलेही शिक्षणाच्या बाबतीत, आर्थिक बाबतीत ती पुरुषाच्या बराेबरीने किंबहुना कधीकधी त्याच्या वरचढ असतेही, सगळया माध्यमात तिला आपली मतं मांडण्याचा अधिकार आपण छातीठाेकपणे दिलाय. पण एका डिपार्टमेंट मध्ये मात्र ती स्व:ताला अजुनही अपंग, हतबल समजते ते म्हणजे "arranged marriage", जन्मापासुन असंख्य जबाबदार्‍या पार पाडत पाडत ती वयाच्या अश्या टप्पयावर येऊन थ‍ांबते की तिचा हया अतिरिक्त मागण्यांनी जीव गुदमरताे, कधी हयाची कारणे शाेधण्याचा प्रयत्न तिच्या जन्मदात्यांनी केला असेल का? दाेष त्यांचा नसताेच, समाज नावाच्या दलदलीत त्यांना सुध्दा तग धरायचा असताे त्यामुळे वयात आलेल्या मुलीच्या डाेक्यावर कधी एकदा अक्षदा पाडुन, सुटकेचा निश्‍वास घ्यायचा असताे मग भले

कल्पतरु

कधी कधी वाटत... अगदि लहान असल्यासारखं तिला घट्ट मिठी मारुन ढसाढसा रडावं. लहानपणापासुन आतापर्यंत आपल्यामुळे झालेला त्रास, मनस्ताप हयाचि उजळणी करुन माफी मागावी. रागात आपल्या ताेंडातुन निघालेले धारधार शब्द किती लागले असतील ना तिच्या मनाला. जन्माला येवुन तिचा वांझाेटापणा दुर करुन तिच्यावर उपकार केल्यासारखे आपण वागताे. किती सहज गृहित धरताे आपण तिला. तिच्या इच्छा-अपेक्षांची यादि तेव्हाच फाडुन फेकुन दिली जेव्हा आपला जन्म झाला. अख्ख आयुष्य वेचल तिने आपल्याला घडवण्यात, बदल्यात कसलीच अपेक्षा न ठेवता. तरी आपण जरा कुठे कमी पडले का शहाणपणाचे धडे गिरवताे. घालुन पाडुन बाेल्ल का आपल्या कसं बरं वाटत. आपल्या पंखात जिने बळ भरलयं. तिच आपल्या मायेला पारखी झालिये. कितीही नालायक असलाेतरी बापासमाेर वकीली तीच करते. तुमचं कस हाेणार हया विचारांच आेझ घेऊन ती हया वयात रात्रिची कुस बदलते. आपण मात्र तिला दुखवुन सुध्दा साखरझाेपेत असताे. वयाेमानानुसार ती सुध्दा खुप थकलीये. खुप शारिरिक वेदना तिला सुध्दा खुपतायेत पण त्याची झळ तुम्हाला कधीच बसु देणार नाही. आपण माेठ हाेण्याच्या नादात तिच्यापासुन तुटत चाललाेय. ती न

बाजीगर

तिच्यासाठी देवळात जाणारा, तिचा प्रत्येक शब्द झेलणारा, तिच्यासाठी कईक शपथा घेतलेल्या. तिच्यासाठी सारे जमाने से विरुध्द हाेणारा, एक जिस्म दाेन जानवाला, हार्डकाेर लव्हर हाेता. साता जन्मापासुन नात असल्यासारख प्रेमात बुडालेले. तिच बहुतेक पहिलच असावं, ताे मात्र हया क्षेत्रात पारंगतच. प्रियकर-प्रेयसीच्या जबाबदार्या दाेघं नेटाने पार पाडत हाेते, दाेघ ऐकमेकांसाठी आधार का काय हाेते. २-४ वर्ष अगदि सुखात परिकथेसारखी गेली. हळु-हळु दाेघं एकमेकांना "चांगलेच" आेळखायला लागले. ताे जास्तच possesive झाला, तिला पण त्याच छाेटया छाेटया गाेष्टीत लक्ष देणं खटकायला लागल. तिला स्पेस आणि फ्रिडम हवा हाेता. ती त्याला टाळु लागली. खटके उडायला लागले. त्याच्यासाेबत रिलेश्नशीपमध्ये येण्याचा निर्णय चुकीचा हाेता हे तिला कळु लागल, त्याला हया सगळ्या परिणामांची कल्पना हाेतीच, त्याच्या खिशात असे कितीतरी अनुभव घालुन पाेरी निघुन गेल्या हाेत्या. म्युचयल अनडरस्टँन्डीन्गने दाेघांनी ब्रेक घ्याच ठरवल. ताे काळ ऐवढा वाढला की, त्याचं तुटलं. ताे काय कच्चा गुरुचा चेला नव्हता ताे काही गम-बिम वगैरे मध्ये बुडला नाही.