Skip to main content

Posts

Showing posts from June, 2017

अपेक्षाभंग

अपेक्षाभंगाच दु:ख खुप वाईट असते, खरच. कितीही नाही म्हंटल तरी, आपण ज्यासाठी काहीतरी करताे त्याबद्दल्यात तेवढं नाही पण थाेडीतरी परतफेड करावी. मग ती कुठलीही असाे प्रेम, भावना किंवा वस्तु. पण कितीही झाल तरी जितके महत्‍तव आपण एखादयाला देताे त्याच्या तुलनेत आपल्याला मिळालेल कमीच का वाटत? लाेक आपल्याला कायम एक पर्याय म्हणुनच ठेवतात ही भावना किती भयावह आहे ना, एखादया बंद खाेलीत आपल्याला काेंडुन ठेवल्यासारख. EXPECTATIONS KILLS अस म्हणतात ते तंताेतत खर आहे. जवळच्या माणसांनी दिलेली दु:ख जास्त खाेलवर रुतुन बसतात. जाणतेपणे घडलेलं नसेलही अस समजुन आपण त्यांना अजुन संधी देताे कारण तिच/त्याच असणं खुप गरजेच असत आपल्या आयुष्यातली ती पाेकळी भरुन काढण्यासाठी. मन घाबरत दुसर्‍या काेणाला जवळ करायला, ती/ताे पण तशीच वागली तर. अनुभवाच झापड न पडलेलच बर. दुसर्‍याच्या आयुष्यात स्व:तच स्थान काय हया प्रश्नाच उत्तर शाेधायला कधिच जावु नका. गर्दिच्या ठिकाणी जीव काेंडल्याशिवाय राहणार नाही. तुमचा त्यांच्या आयुष्यातला क्रम काहीही असाे, फाेनमध्ये नाव काहीही असाे, फाेटाेत तुम्ही टॅग नसालही पण तुम्ही असाल त्यांच्यासाठी एक

मायाजाळ-फेसबुक

फेसबुक सुटल, हाे हाे सुटलच. काेणी बाेल्ल का, काेणाला दाखवायच म्हणुन नाहीतर. कंटाळला जीव. फेसबुकमुळे खुप विचित्र सवयी लागत हाेत्या. तासन् तास ते ५ इंचाच्या स्क्रिनमध्ये डाेक खुपसुन बसायला लागत हाेत. दुसर्‍याच वाकुन बघायची तीव्र इच्छा व्हायची. समाेरच्याच्या प्रत्येक वागण्याला मी लाईक्स आणि कमेन्टनी मापत गेलाे. लाेक किती छान आयुष्य दाखवतात ना फेसबुकवर, अगदि एखादयाला हेवा वाटावा इतक. निल आर्मस्ट्राँग जसा चंद्रावर जाणारा पहिला माणुस हाेता तस हे पृथ्वीवरच्याच कुठल्यातरी काेपर्‍यात  मीटरभर जावुन चेकइन करत असतात. खाताना साेनंचांदी खाताे असे डिशेसचे फाेटाे टाकताे. मित्रमैत्रीणिंना कधीही स्व:ताहुन मेसेज न करणारे, प्रत्येक फाेटाेत टॅग करायच कधीच विसरत नाहीत. किती आभासि जगताे ना, तुम्ही काय आणि मी काय आपण सगळयांनी थाेडयाफार फरकाने हेच केलय आणि करत राहु. खरच हयाची गरज आहे का, कधीतरी विचारु स्व:ताला प्रश्‍न. उत्तर नाहीच भेटल तर थाेडया दिवस लांब राहु, मन चलबिचल हाेईल, लक्ष जाईल अॅप कडे, सुंदर सुंदर फाेटाेज टाकायचा माेह हाेईलही. काेणी काय अपलाेड केलय हयाची लालसा हाेईल शेवटी इतक्या दिवसाच्या सवय