"काेपर्डीतली ती"
असाच जुना पेपर चाळताना ती "काेपर्डी"ची बातमी नजरेला आली. सगळ्याच घटना आपण किती पटकन विसरताे ना. आपल्या साेबत प्रसार माध्यमांना सुध्दा वेगवेगळे विषय भेटलेत चघळायला.
असाच जुना पेपर चाळताना ती "काेपर्डी"ची बातमी नजरेला आली. सगळ्याच घटना आपण किती पटकन विसरताे ना. आपल्या साेबत प्रसार माध्यमांना सुध्दा वेगवेगळे विषय भेटलेत चघळायला.
अस काही झाल का किती चटकन प्रतिक्रिया देताे ना आपण. फेसबुकवर माेठेच्या माेठे रकाने गिरवले, ठळक घडामाेडींमध्ये ती झळकलीही. न्युजरुम मध्ये वाॅर झाले. नेते मंडळींची पायधुळ तिच्या उंबरठयाला लागली. कितीतरी माैर्चे निघाले सगळं समाजमन अगदि ढवळुन निघाले. आम्ही हया व्यतिरिक्त काहीच करु शकत नाही.
पुढे काय झाल तुझ्या बाबतीत माहिती नाही. तुझ्या केसची फाईल कुठेतरी अडगळीत धुळ खात असेल. तुझ्या आठवणी विरुन चालल्यात. तुझे घरचे खुप सार्या गाेष्टींची झगडत असतील. आम्ही आमच्या खाजगी आयुष्यात खुप व्यस्त आहाेत. राेज पेपरात तुझ्याशी मिळतीजुळती बातमी असतेच. ती ऐकुन आमचं ह्दय पिळवटुन निघतं. चर्चा हाेतात, दिवस पुढे सरकत जाताे आणि काहीच बदलत नाही.
मी तर नेहमी ते हाेण्या मागची कारणे शाेधत असताे. डाेक्यात विचारांची रांग लागते. सगळयांसारखाच मी सुध्दा हतबल हाेताे. करणारे सुध्दा आमच्यासारखे साे काॅल्ड पुरुष हाेते, त्या वासनांध झालेल्याला जनावरांना कशाशीच भीती नाही वाटली का? ऐवढं निर्दयता येते कुठुन. पकडले जाऊन सुध्दा ते फक्त संशयित हाेतात, त्यांची नाव सिक्रेट अेजन्ट सारखी गुपित राहतात. तुला मात्र नेहमी काहीतरी विशेष नाव भेटत.
वर्षामागुन वर्ष उलटतायेत, कायदा पण कडक काय हाेताेय. पण मानसिकता आणि गाेष्टी काही बदलत नाहीत.
सहजच आलेला विचार."
समीर क्षमा दत्तात्रय कडु (लाेणावळा)
Comments
Post a Comment