Skip to main content

Posts

सरते वर्ष

प्रत्येक वर्षीसारख हे वर्ष पण त्याच्या गतीनेच सरकले. चांगले - वाईट अनुभव तारखांचे लेबल लावुन भुतकाळात गुरफटुन पडलेत, पुढे जावुन आठवणी नावाचा साज लेवुन सुखावण्याच काम क...

शब्द

बाेलताना खरच विचार करावा का?? नाही पडत ना आपल्याला कधी प्रश्न, बाेबडे बाेल बाेलता बाेलता आपण कधी शब्दरुपी विष आेकु लागताे आपल्यालाच कळत नाही. लहान असताना बालिश म्हणुन त्य...

अपेक्षाभंग

अपेक्षाभंगाच दु:ख खुप वाईट असते, खरच. कितीही नाही म्हंटल तरी, आपण ज्यासाठी काहीतरी करताे त्याबद्दल्यात तेवढं नाही पण थाेडीतरी परतफेड करावी. मग ती कुठलीही असाे प्रेम, भावन...

मायाजाळ-फेसबुक

फेसबुक सुटल, हाे हाे सुटलच. काेणी बाेल्ल का, काेणाला दाखवायच म्हणुन नाहीतर. कंटाळला जीव. फेसबुकमुळे खुप विचित्र सवयी लागत हाेत्या. तासन् तास ते ५ इंचाच्या स्क्रिनमध्ये डाेक खुपसुन बसायला लागत हाेत. दुसर्‍याच वाकुन बघायची तीव्र इच्छा व्हायची. समाेरच्याच्या प्रत्येक वागण्याला मी लाईक्स आणि कमेन्टनी मापत गेलाे. लाेक किती छान आयुष्य दाखवतात ना फेसबुकवर, अगदि एखादयाला हेवा वाटावा इतक. निल आर्मस्ट्राँग जसा चंद्रावर जाणारा पहिला माणुस हाेता तस हे पृथ्वीवरच्याच कुठल्यातरी काेपर्‍यात  मीटरभर जावुन चेकइन करत असतात. खाताना साेनंचांदी खाताे असे डिशेसचे फाेटाे टाकताे. मित्रमैत्रीणिंना कधीही स्व:ताहुन मेसेज न करणारे, प्रत्येक फाेटाेत टॅग करायच कधीच विसरत नाहीत. किती आभासि जगताे ना, तुम्ही काय आणि मी काय आपण सगळयांनी थाेडयाफार फरकाने हेच केलय आणि करत राहु. खरच हयाची गरज आहे का, कधीतरी विचारु स्व:ताला प्रश्‍न. उत्तर नाहीच भेटल तर थाेडया दिवस लांब राहु, मन चलबिचल हाेईल, लक्ष जाईल अॅप कडे, सुंदर सुंदर फाेटाेज टाकायचा माेह हाेईलही. काेणी काय अपलाेड केलय हयाची लालसा हाेईल शेवटी इतक्या दिवसाच्या...

रिमा लागु

चित्रपटातील आईच्या भुमिका सार्थ निभावण्याची क्षमता ज्या थाेडया अभिनेत्रींमध्ये आहे त्या यादि मधल्या एक म्हणजे "रिमा लागु"... तुमच्या अभिनयाच्या कक्षा फक्त मराठीपर्यंतच मर्यादित न राहता त्या हिंदी सृष्टीत सुध्दा पसरवल्या. श्रीमान-श्रीमती मधली ती भाेळसट बायकाे,  तुतु-मैंमै मधली नाटाळ-अवखळ सासु अजुनही आमच्या ठळक लक्षात आहेत. मैंने प्यार किया, आशिकी, साजन, हम आपके है काेैन, कल हाे ना हाे, कुछ कुछ हाेता है हयात तुम्ही वठवलेल्या भुमिकेत मायेचा आेलाव जास्त हाेता. नाटक रंगभुमीवरचा तुमचा वावर सांगता येणार नाही इतका विस्तीर्ण आहे. हिंदी पडदयावर तुम्हाला बघितला का अभिमान जरा जास्त वाटायचा. चंंदेरी दुनियेतल्या तसेच खाजगी आयुष्यातल्या विविध भुमिका पार पाडता पाडता तुमची झालेली एक्झिट थाेडी चटका लावणारी आहे. ईश्वर तुमच्या आत्मयास शांती देवाे.... समीर क्षमा दत्तात्रय कडु (लाेणावळा) PC: Google.co.in

लग्न - अग्नीपरिक्षा

तारखा पुढे पुढे सरकतात, वर्ष उलटत असतात, सगळं अगदी निर्सगाच्या नियमाने घडत असते. वयाचे काही पायंडे आपल्या पुर्वजानी घालुनच दिलेत त्याला सुध्दा आपण अपवाद नाही. मुलींच्या बाबतीत तर ते जरा जास्तच आहेत, मुलींच्या वयाचे निकष आधिच ठरवुन दिलेत म्हणजे जर तुम्ही त्या ठराविक वयाेगटात असाल तर तुमची मागणी अधिक असते. एकविसाव्या शतकात वावरत असताना भलेही शिक्षणाच्या बाबतीत, आर्थिक बाबतीत ती पुरुषाच्या बराेबरीने किंबहुना कधीकधी त्याच्या वरचढ असतेही, सगळया माध्यमात तिला आपली मतं मांडण्याचा अधिकार आपण छातीठाेकपणे दिलाय. पण एका डिपार्टमेंट मध्ये मात्र ती स्व:ताला अजुनही अपंग, हतबल समजते ते म्हणजे "arranged marriage", जन्मापासुन असंख्य जबाबदार्‍या पार पाडत पाडत ती वयाच्या अश्या टप्पयावर येऊन थ‍ांबते की तिचा हया अतिरिक्त मागण्यांनी जीव गुदमरताे, कधी हयाची कारणे शाेधण्याचा प्रयत्न तिच्या जन्मदात्यांनी केला असेल का? दाेष त्यांचा नसताेच, समाज नावाच्या दलदलीत त्यांना सुध्दा तग धरायचा असताे त्यामुळे वयात आलेल्या मुलीच्या डाेक्यावर कधी एकदा अक्षदा पाडुन, सुटकेचा निश्‍वास घ्यायचा असताे मग भले ...

कल्पतरु

कधी कधी वाटत... अगदि लहान असल्यासारखं तिला घट्ट मिठी मारुन ढसाढसा रडावं. लहानपणापासुन आतापर्यंत आपल्यामुळे झालेला त्रास, मनस्ताप हयाचि उजळणी करुन माफी मागावी. रागात आपल्या ताेंडातुन निघालेले धारधार शब्द किती लागले असतील ना तिच्या मनाला. जन्माला येवुन तिचा वांझाेटापणा दुर करुन तिच्यावर उपकार केल्यासारखे आपण वागताे. किती सहज गृहित धरताे आपण तिला. तिच्या इच्छा-अपेक्षांची यादि तेव्हाच फाडुन फेकुन दिली जेव्हा आपला जन्म झाला. अख्ख आयुष्य वेचल तिने आपल्याला घडवण्यात, बदल्यात कसलीच अपेक्षा न ठेवता. तरी आपण जरा कुठे कमी पडले का शहाणपणाचे धडे गिरवताे. घालुन पाडुन बाेल्ल का आपल्या कसं बरं वाटत. आपल्या पंखात जिने बळ भरलयं. तिच आपल्या मायेला पारखी झालिये. कितीही नालायक असलाेतरी बापासमाेर वकीली तीच करते. तुमचं कस हाेणार हया विचारांच आेझ घेऊन ती हया वयात रात्रिची कुस बदलते. आपण मात्र तिला दुखवुन सुध्दा साखरझाेपेत असताे. वयाेमानानुसार ती सुध्दा खुप थकलीये. खुप शारिरिक वेदना तिला सुध्दा खुपतायेत पण त्याची झळ तुम्हाला कधीच बसु देणार नाही. आपण माेठ हाेण्याच्या नादात तिच्यापासुन तुटत चाललाेय. ती न...

बाजीगर

तिच्यासाठी देवळात जाणारा, तिचा प्रत्येक शब्द झेलणारा, तिच्यासाठी कईक शपथा घेतलेल्या. तिच्यासाठी सारे जमाने से विरुध्द हाेणारा, एक जिस्म दाेन जानवाला, हार्डकाेर लव्हर हाेता. साता जन्मापासुन नात असल्यासारख प्रेमात बुडालेले. तिच बहुतेक पहिलच असावं, ताे मात्र हया क्षेत्रात पारंगतच. प्रियकर-प्रेयसीच्या जबाबदार्या दाेघं नेटाने पार पाडत हाेते, दाेघ ऐकमेकांसाठी आधार का काय हाेते. २-४ वर्ष अगदि सुखात परिकथेसारखी गेली. हळु-हळु दाेघं एकमेकांना "चांगलेच" आेळखायला लागले. ताे जास्तच possesive झाला, तिला पण त्याच छाेटया छाेटया गाेष्टीत लक्ष देणं खटकायला लागल. तिला स्पेस आणि फ्रिडम हवा हाेता. ती त्याला टाळु लागली. खटके उडायला लागले. त्याच्यासाेबत रिलेश्नशीपमध्ये येण्याचा निर्णय चुकीचा हाेता हे तिला कळु लागल, त्याला हया सगळ्या परिणामांची कल्पना हाेतीच, त्याच्या खिशात असे कितीतरी अनुभव घालुन पाेरी निघुन गेल्या हाेत्या. म्युचयल अनडरस्टँन्डीन्गने दाेघांनी ब्रेक घ्याच ठरवल. ताे काळ ऐवढा वाढला की, त्याचं तुटलं. ताे काय कच्चा गुरुचा चेला नव्हता ताे काही गम-बिम वगैरे मध्ये बुडला नाही. ...

परकी

एव्हाना तुझ्या अंगावरचा हळदिचा रंग उतरुन, मुळ रंगात आलिही असशील. नवीन घरात तुझे काेडकाैतुक साेहळे चालु झालेही असतील. दाेष तुझा नाही, स्वभावच तुझा लाघवी आहे. समाेरच्याला आपलंस करुन घेणं तुला कस काय जमंत हे मला न उलगडलेलं काेडंच आहे. तु राजाराणीच्या संसारात रुळशीलही, आनंदात राहशील हयातच मी आता समाधान मानलं पाहिजे. तु कायम सगळंयाचाच विचार करत आलिस, काेणाच्याच मनाविरुध्द जायचं नव्हतं तुला. हयाची किंमत मला मात्र चुकवावी लागली. बहुतेक माझ्याच प्रेमाच्या पारडयात कसली तरी उणीव राहिली आणि तुझ झुकत माप तुझ्या जन्मदातांच्या वाटयाला आले. निर्णय घेताना तुला सुध्दा यातना, कष्ट झाले असतील पण त्यावर वेळ हे उत्तम आैषध आहे हयाचा अनुभव तुला  सुध्दा येईलच. हया जीवघेण्या गर्दित आपण एकमेंकाना शाेधल हाेतं. आवडीनिवडी जुळत हाेत्या, आपण एकमेंकाची गरज हाेताे. तुझ एवढं प्रेम हाेत की, तुला मी कधी गमवेल अशी शंका कधी मनात आलीच नाही आंधळाच झालाे हाेताे. पण आज चित्र काहीस वेगळय अगदि भयावह ज्याची मी तरी कल्पना केली नव्हती.  ज्या डाेळयांनी कधीकाळी गुलाबी स्वप्न रंगवली हाेती, त्यात आता आसवं जम...

आयुष्या पल्याड

आयुष्या पल्याड दु:खाची चादर ऐवढी नरम आणि गरम असते की काही लाेकं ती कायमची पांघरुन घेतात. त्यात सगळेच त्यांच्यासाठी आसवं ढाळतात. पण कुठपर्यंत, जाे पर्यंत तुमच्याकडुन त्यांना इच्छित फायदा ताे पर्यंत. नंतर तुम्हाला लाेकं टाळतात. करायच आहे तर स्व:त काहीतरी करा स्वत:साठी. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही अस म्हणतात. करुया ना धडपड, जावुयात ना खाचखळगयातुन. काहीही न करता आयुष्याची लख्तर हाेण्यापेक्षा, काहीतरी केल्याच समाधान मिळु दया ना. चांगले झाले तर जन्म सार्थकी आणि वाईट झाले तर दुसर्यांना दाेष तरी लागणार नाही, स्व: जबाबदार असाल. परिणामांची पर्वा न करता, प्रमाणिक प्रयत्न करा. आपले भाेग आपणच भाेगुन संपवायचे असतात.  कम्फर्टझाेन नावाच वलय माेडुन टाका हाेवु दे हाल, अपेष्टा, उपसा की कष्ट. थाेडयाफार फरकाने आयुष्य जगण्याची मजा त्यातच आहे. सुखाच्या मृगजळाचा पाठलाग करणे हे आपले ध्येय नसले, तरी आपल्या सगळ्यांना आयुष्यातली दु:खाची वजाबाकी करावीशी वाटतेच ना. Life is beyond ur Comfort zone... समीर क्षमा दत्तात्रय कडु (लाेणावळा)

मिठी

मिठी तुझ्या मिठित असताना माझा मात्र गाेंधळ हाेताे, नक्की ठाव काेणाच्या धडधडण्याचा घ्यावा. तुझं अत्तरही आता माझ्या अंगरख्यावर रेंगाळतय. ती आपल्या हातांची कैद कधी सुटुच नये, सुसाट्याच्या वारयासारखे वाहणारया श्वासांची, मंद झुळुक व्हावी. वेळ कासवाच्या गतीने पुढे सरकावा आणि भाेवतालच जग त्यात विरुन गेलेलं असावं. समीर क्षमा दत्तात्रय कडु (लाेणावळा) PC: Google

कसरत

लहानपणी अगदि राजकन्येसारखी नाही पण बर्‍यापैकी लाडाकाेडात वाढलेली मी, घरात पहिली मुलगी म्हणुन की काय हट्टीपणा माझ्यात रुळलाय पण ताे जबाबदार्‍यांच्या जाणिवेमुळे कमी सुध्दा झालाय. वय वाढत तस जबाबदार्‍या पण वाढतात त्याच बराेबर घरच्यांची इभ्रत, मान सांभाळत सांभाळत मी तारुण्य गाठलय. मला नेहमीच स्वावलंबी वाहयच हाेत. त्यासाठी फार नाही पण हाे त्याग केलाय मी, प्रसंगी घरच्यांपासुन लांब राहुन, आलेल्या कुठल्याही संकटांना ताेंड दिलय हे काय अगदि जगळावेगळ नाही केल पण हतबलता, निराशा माझ्या वाटयाला सुध्दा आलिये. ठराविक वय झाल का प्रत्येक मुलीच्या जन्मदात्यांना जे टेन्शन असतं तस माझ्या सुध्दा हाेतं ते स्वाभाविकच असतं नाही का? मी कधिच त्यांच्या इच्छेच्या आड अाले नाही. जेव्हा त्यांच्या मनात आले तेव्हा स्वप्‍नांचा गाशा गुंडाळुन निमुटपणे बाेहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाले. जाेडीदारासाठीच्या अपेक्षांची यादि कधी मला करताच आली नाही. कुठल्यातरी जन्माची पुण्याई शिल्लक म्हणुन तुझ्याशी बंध जुळले. तु प्रत्येक गाेष्टीत उजवा आहेस, तुझ्याशीच उरलेलं आयुष्य घालवायचय हा माझा कायम अट्टाहास राहिलच. किती छान जमत तुला मा...

काेपर्डीतली ती

"काेपर्डीतली ती" असाच जुना पेपर चाळताना ती "काेपर्डी"ची बातमी नजरेला आली. सगळ्याच घटना आपण किती पटकन विसरताे ना. आपल्या साेबत प्रसार माध्यमांना सुध्दा वेगवेगळे विषय भेटलेत चघळायला. अस काही झाल का किती चटकन प्रतिक्रिया देताे ना आपण. फेसबुकवर माेठेच्या माेठे रकाने गिरवले, ठळक घडामाेडींमध्ये ती झळकलीही. न्युजरुम मध्ये वाॅर झाले. नेते मंडळींची पायधुळ तिच्या उंबरठयाला लागली. कितीतरी माैर्चे निघाले सगळं समाजमन अगदि ढवळुन निघाले. आम्ही हया व्यतिरिक्त काहीच करु शकत नाही. पुढे काय झाल तुझ्या बाबतीत माहिती नाही. तुझ्या केसची फाईल कुठेतरी अडगळीत धुळ खात असेल. तुझ्या आठवणी विरुन चालल्यात. तुझे घरचे खुप सार्‍या गाेष्टींची झगडत असतील. आम्ही आमच्या खाजगी आयुष्यात खुप व्यस्त आहाेत. राेज पेपरात तुझ्याशी मिळतीजुळती बातमी असतेच. ती ऐकुन आमचं ह्दय पिळवटुन निघतं. चर्चा हाेतात, दिवस पुढे सरकत जाताे आणि काहीच बदलत नाही. मी तर नेहमी ते हाेण्या मागची कारणे शाेधत असताे. डाेक्यात विचारांची रांग लागते. सगळयांसारखाच मी सुध्दा हतबल हाेताे. करणारे सुध्दा आमच्यासारखे साे काॅल्ड पुरुष हाेते...